October 21, 2016

Thinking in Marathi

This is a collection of my Marathi writings.
Until next time!

तिचा गंध माझ्या केसात भिनलेला ,
मी तिच्या केसात विणलेला .
रात्र सारून गेल्यावरही ,
मी स्वतः पासूनच हरवलेला .
---
काही न बोलता , तुझ्या ओठातलं मला कळतं .
जसं एका कळीला अंधारात फुलायला जमतं .
---
होऊन होऊन होतं काय ?
तो तिला पाहतो , तीही लाजते
आणि एक रात्र वेडी होते .
---
या पाकळ्यांना भान नसतं
वाऱ्यात वाहून जाताना.
हे अश्रूही वेडे आहेत,
मला न सांगता ओझरताना .
---
मनातल्या गोष्टी मनातच राहतात
प्रत्येक श्वासात हरवून जातात.
दुपारच्या उन्हात वळून जातात.
आणि संध्याकाळी, रात्रीबरोबर ...
पुन्हा जाग्या होतात.
मनातल्या गोष्टी मनातच राहतात.
---
ज्या वेलीवर मी राहतो तेथे पुष्प असे ना काही .
तेथे पाखरू ना कधी येई.
ती वेल एकटाच मी सजावी
आठवणीत तिला मी गुंफी .
आणि मावळत्या सूर्यात
काही अश्रूईंचे दव साचे .
---
एकदा आपण वेडं होऊन पाहावं
त्यातही एक मजा असते
दररोजचं तेच पाहणं
दररोजचं तेच खाणं
दररोजचं तेच जगणं
प्रत्येक दिवस पुरून उरतो
पण आपण संपून जातो
जगता जगता असेच मारून जातो
म्हणून , एकदा वेडं व्हा
तुम्ही मारतानाही जागून जाल
रडत रडत हसून जाल
प्रेम करायला विचार करायला लागणार नाही
का अश्रूंना वाट पहावी लागणार नाही
फक्त एकदाच वेडे व्हा
---